Just another WordPress site

“मुंबईतील धारावी येथे झालेल्या सभेत तर चला आम्ही तुमच्याबरोबर येतो”-लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.४ मार्च २४ सोमवार

लोकसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष ताकदीने तयारीला लागले आहेत.भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी इंडिया आघाडी देशात काम करते आहे.महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट,शरद पवार गट,काँग्रेस पूर्ण ताकद लावत आहेत.अशातच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील धारावी येथे झालेल्या सभेत तर चला आम्ही तुमच्याबरोबर येतो म्हटले आहे.पूर्वी दिलीप प्रभावळकरांचा एक शो होता हसवाफसवी.आता मोदींचा खेळ सुरु आहे फसवाफसवी.वेगवेगळी रुपे घेऊन नरेंद्र मोदी येतात.मेरा और आपका पुराना रिश्ता हैं वगैरे सांगतात.दोनवेळा आमची फसगत झाली.शिवसेना भाजपाची युती २५ वर्षे होती पण मोदींच्या भुलथापांना आम्हीही भुललो होतो.आमच्या पदरात काय पडले ? धोंडे पडले असते तर ठिक होते त्यांना शेंदूर फासला तर देव तरी होतो यांचे काय ? मागच्या दहा वर्षांत फक्त नामांतरे झाली आहेत. योजनांची नावे बदला,स्टेशन्सची नावे बदला,शहरांचे नाव बदला एवढेच चालले आहे.नुसते योजना किंवा गावांचे नाव बदलत नाही.यांनी जुमल्यांचे नावही गॅरंटी केले आहे.अच्छे दिन,१५ लाख रुपये अकाऊंटमध्ये आले,काळे धन परत आले नाही.. हे सगळे जुमले होते.तुम्ही कितीही पैसे खा आणि भाजपात या तुम्हाला काही होणार नाही ही हल्लीची मोदी गॅरंटी आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

साधारण आठ एक वर्षांपूर्वी मोदींनी बिहारच्या लोकांना सांगितले होते.५० हजार कोटींमुळे बिहारचे काही होणार नाही असे मोदी म्हटले होते असे करत करत सव्वा लाख कोटींचे पॅकेज मोदींनी जाहीर केले होते.या गोष्टीला आठ वर्षे झाली. आता नितीश कुमारांना विचारा की सव्वा लाख कोटी बिहारला मिळाले का ? बिहारच्या जनतेला जर सव्वा लाख कोटी मिळाले असतील तर आम्हीही तुमच्याबरोबर येतो असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.साधी गोष्ट सांगतो भाजपाने १९५ लोकांची यादी जाहीर केली.या यादीत कुणाची नावे आहेत? मोदी-शाह यांची नावे आहेत.आम्हाला नरेंद्र मोदी,अमित शाह नावे माहिती नव्हती.भाजपाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करुन दिली त्यानंतर त्यांच्याबरोबर आले ते नितीन गडकरी होते.युतीच्या काळात त्यांनी ५५ उड्डाणपूल बांधले,भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असलेला माणूस त्यांचे नाव पहिल्या यादीत नाही.मुंबईतला एक माणूस ज्याच्यावर भाजपाने आरोप केले होते.कृपाशंकर सिंह त्याचे नाव पहिल्या यादीत आहे पण गडकरींचे नाही.कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ही भाजपाची जाहिरात होती ना.. आता त्यांनी देश कुठे नेऊन ठेवलाय? हा माझा प्रश्न आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.मागच्या वेळी युतीने ४२ खासदार आले नसते तर दिल्लीचे तख्त राहिले नसते.महाराष्ट्र गीतात म्हटले आहे त्याप्रमाणे आपल्याला आधी दिल्लीचे तख्त फोडावे लागेल आणि मग आपले तख्त तिथे निर्माण करावे लागेल.यांची जी काही मिजास आहे अब की बार ४०० पार मी म्हणतो अब की बार भाजपा तडीपार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.