मला वाटते लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नुकसान होईल तर देशभरातील प्रादेशिक पक्ष चांगले प्रदर्शन करतील.२०१९ मध्ये कमी पडलेल्या काँग्रेसलाच आता याचा फायदा होईल.मतदानाचे आणखी दोन टप्पे बाकी असल्याने आकड्यांचा अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही.भाजपाच्या ‘४०० पार’ मिशनला मोठा फटका बसणार आहे.इंडिया आघाडीने समर्पक मुद्दे मांडले पण मला वाटते की,काँग्रेसने प्रचारात म्हणावा तसा मोदींवर हल्लाबोल केला नाही.उदाहरणार्थ काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींना लिहिलेले पत्रातून (मालमत्तेच्या वितरणाबाबत) मुस्लिमांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्याची गरजच कुठे होती ? भाजपा आणि मोदींचा दलित, मुस्लिम विरोधी आणि गरीब विरोधी चेहरा उघड करण्यासाठी काँग्रेसने भाजपाने दिलेल्या आयत्या मुद्द्यांचा वापर करायला हवा होता व ती उणीव भासत होती.भाजपाच्या विरोधात मतांचे एकत्रिकरण पाहून समाजातील सदस्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती.संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही हे दिसून आले.दलित भाजपाला पुन्हा पाठीशी घालणार नाहीत.त्यांना आरएसएसची विचारधारा आणि हिंदु राष्ट्राची कल्पना याविषयी भीती वाटत होती.मोदींच्या विकासाच्या फळीबद्दलही त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.१० वर्षांच्या मोदी सरकारच्या अपयशावर पांघरूण घालण्याच्या उद्देशाने ही एक धोरणात्मक चाल आहे.मी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये फिरलो आहे जिथे मी तरुणांना बेरोजगारीचे प्रश्न सतावत आहेत.वस्तू आणि सेवा कर (GST) मुळे लघु गुंतवणूकदार आणि उद्योग संतप्त झाले आहेत तर महागाई ही राज्यांमध्ये मोठी समस्या आहे. महाराष्ट्रात संपूर्ण मराठा विरुद्ध ओबीसी ध्रुवीकरण झाले आणि त्याचा काही भागांत भाजपावर परिणाम झाला.भाजपाने जातीयवादी मोहीम सुरू केली होती जिथे मोदींनी मंगळसूत्र आणि संपत्ती हिसकावून अल्पसंख्याकांना सुपूर्द केल्याबद्दल सांगितले.पंतप्रधानांकडून अपेक्षित असलेली सर्व शालीनता नष्ट झाली असून मोदींनी आता ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या दिलखुलास मुलाखतीतून सांगितले आहे.