Just another WordPress site

यावल वनविभागाच्या गस्ती पथकाच्या कारवाईत चारचाकी वाहनासह लाखांचा माल जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१२ जून २४ बुधवार

येथील वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या धडक कारवाईत अवैद्यरित्या कटाई केलेल्या लाकुडाची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की,काल दि.११ जुन रोजी रात्रीच्या सुमारास वन विभागास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वनविभागाने सापळा रचुन यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरील मनुदेवी मंदिराजवळ टाटा कंपनीचे ३११८ वाहन क्रमांक एमएच १८,बिजी२१५३ या चारचाकी वाहनाची चौकशी केली असता यामध्ये विनापरवाना अवैध लाकूड भरलेले दिसून आले. वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक संदर्भात परवाना मिळून आला नाही.यावेळी वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने चारचाकी वाहन मुद्देमालासह लाखांचा अवैद्यरित्या कटाई केलेला लाकुड पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन शासकीय मुख्य विक्री केंद्र यावल येथे आणून जमा करण्यात आला.यात निम जळावू लाकूड घ.मी. ३५.०० मिळुन आले असून वनविभागाने या गुन्हे प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ ( २ ) ब,४२,५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या कार्यवाहीत आनंदा पाटील,वनपरीक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल,रमेश थोरात वनपाल,रानुदास जाधव वनपाल,आनंद तेली,वाहन चालक यांच्या पथकाने यात सहभाग घेतला.सदर कार्यवाही ही श्रीमती नीनू सोमराज वनसंरक्षक धुळे (प्रा ),जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव ,राजेंद्र सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे,प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्प यावल यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.