टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले.राज्यात दुष्काळाची परिस्थिती असतांना सरकार मंत्री सुट्टीवर गेले.मंत्र्यांना परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते त्यामुळे या मंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी कोणाची परवानगी घेतली होती याचा खुलासा झाला पाहिजे असे ते म्हणाले.आज राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे व त्याला आता आधाराची गरज आहे तसेच राज्यातील जनता दुष्काळात होरपळत आहे.ही दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी तसेच जनावरांसाठी चारा छावण्या तसेच पिण्याच्या पाण्याचीही सोय करावी अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले हे महाराष्ट्राचे दैवत आहेत मात्र या मोदी सरकारने संसद परिसरातून या महारपुरुषांची पुतळे काढले आहेत त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून याबाबत राष्ट्रपती महोदयांना आमच्या भावना कळवा अशी मागणी केल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.