यावल-सातोद रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळांच्या संरक्षण भिंती व प्रवेशव्दार अभावी विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ मे २६ बुधवार
येथील यावल सातोद रोडवरील जिल्हा परिषद ऊर्दू शाळा व मराठी शाळा यांना संरक्षण भिंत व प्रवेशद्वार नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षतीता धोक्यात आली असुन जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष पुरवून या शाळांना संरक्षण भिंती व प्रवेशव्दार बांधण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.
यावल येथील सातोद-कोळवद मार्गावरील असलेल्या जिल्हा परिषदची ऊर्दू शाळा व गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालया शेजारीच असलेल्या जिल्हा परिषदच्या मराठी शाळेला संरक्षण भिंत आणि प्रवेशव्दार नसल्याकारणाने शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.दरम्यान या मार्गावर विविध वाहनांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे विद्यार्थी खेळता खेळता बाहेर आल्यावर अपघात झाल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न या ठिकाणी पालकांमध्ये उपस्थित केला जात आहे.सदरहू या दोन्ही शाळांना संरक्षण भिंती व प्रवेशव्दार नसल्याने या ठिकाणी रात्रीच्या वेळेस नको ते कारभार या ठिकाणी सुरू असतात व अशा वेळेस शाळेच्या आवारात काही अप्रीय घटना घडल्यास यास जबाबदार कोण ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.परिणामी प्रशासनाने तात्काळ या विषयाची दखल घेत होणारी संभाव्य अप्रीय घटना लक्षात घेवून या शाळांना संरक्षण भिंत व प्रवेशव्दार बांधावे अशी मागणी अनेक पालकवर्ग व नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.