रात्रभरात या रुग्णांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार करण्यात येत होते मात्र त्यातील काहींची प्रकृती गंभीर होती त्यामुळे उपचारांदरम्यान आत्तापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार चालू आहेत त्यातही अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी माहिती समोर आली आहे.दरम्यान या प्रकरणाचा तामिळनाडू पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून एका व्यक्तीला अटक देखील केली आहे.पोलिसांनी यासंदर्भात ४९ वर्षीय गोविंदराज उर्फ कन्नूकुट्टी या व्यक्तीला अटक केली आहे.बेकायदेशीररीत्या दारू गाळून विकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.गोविंदराजकडून पोलिसांनी तब्बल २०० लिटर अरकचे कॅनही जप्त केले आहेत.या दारूचे नमुने तातडीने विल्लुपुरम येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले त्यामध्ये विषारी मिथेनॉलचे मोठे प्रमाण असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी या घटनेचा आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे.कल्लाकुरिचीमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे झालेल्या मृत्यूंचे वृत्त ऐकून मला धक्का बसला असून प्रचंड दु:ख झाले आहे.या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे तसेच हा प्रकार होण्यासाठी जे कामचुकार अधिकारी कारणीभूत होते त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे असे स्टॅलिन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.या पोस्टमध्ये स्टॅलिन यांनी सविस्तर निवेदनही शेअर केले आहे तसेच जर लोकांनी अशा बेकायदेशीर दारू गाळपाच्या प्रकारांबाबत तक्रार केली तर त्यावर तातडीने कारवाई केली जाईल.समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या अशा गुन्हेगारांवर अजिबात दया दाखवली जाणार नाही असेही स्टॅलिन यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.