Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Tuesday, March 17, 2026

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

फक्त साडेसहा तासांत ७६ लाख मते वाढली ? !! परकला प्रभाकर यांनी प्रत्येक मतासाठीचा वेळ सांगत केला ३ अशक्य गोष्टींचा दावा !!

निवडणूक घडामोडी विशेषदेश घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक On Nov 29, 2024 0

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२९ नोव्हेंबर २४ शुक्रवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटल्यानंतरही निवडणूक निकालांबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतांना सत्ताधारी पक्षांच्या बऱ्याच विजयी आमदारांना एकसारखी मते कशी पडली ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर  दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती परकला प्रभाकर यांनी थेट आकडेवारी मांडत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांमध्ये गैरप्रकार झाल्याचा दावा केला असून द वायरसाठी सुप्रसिद्ध मुलाखतकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये परकला प्रभाकर यांनी आकडेवारीनिशी दावे केले आहेत.

५० तासांत ७६ लाख मते वाढली !

मतमोजणीच्या दिवशी २० नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपासून रात्री ११.३० वाजेपर्यंत मतांच्या एकूण आकड्यात व पर्यायाने टक्केवारीतही अविश्वसनीय वाढ झाल्याचा दावा परकला प्रभाकर यांनी केला आहे.“मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी ५८.२२ टक्के होती.ही जवळपास ५ कोटी ६४ लाख ८८ हजार ०२४ मतं होतात.त्या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवाऱी थेट ६५.०२ टक्क्यांवर पोहोचली.हा आकडा जवळपास ६ कोटी ३० लाख ८५ हजार ७३२ इतका आहे त्यामुळे २० नोव्हेंबरला संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० यादरम्यान मतांच्या एकूण संख्येत तब्बल ६५ लाख ९७ हजार ७०८ मतांची वाढ झाली. एवढेच नाही तर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्याच्या आधी एकूण मतांमध्ये ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची भर पडल्याचे सांगण्यात आले” असे ते म्हणाले.

मते वाढण्यासाठी कोणता युक्तिवाद ?

दरम्यान मतदानाच्या शेवटच्या अर्ध्या तासात वाढलेल्या मतांसाठी सत्ताधारी वर्गाकडून रांगेत उभ्या राहिलेल्या मतदारांचे कारण दिले जात आहे.संध्याकाळी ६ वाजेपर्यंत (मतदानाची मुदत) रांगेत उभ्या राहिलेल्या मतदारांनी नंतर मतदान केल्यामुळे ही वाढ झाल्याचा दावा करण्यात येत आहे त्याच दाव्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी चर्चा करण थापर व परकला प्रभाकर यांच्यात या मुलाखती दरम्यान झाली.

१ हजार मते साडेसहा तासांत शक्य आहेत का ?

मुलाखतीमध्ये करण थापर यांनी मतांचा आकडा आणि लागणारा वेळ यांचे गणित मांडले असून “आपण असे मानुयात की संध्याकाळी ६ पर्यंत मतदान केंद्राबाहेरच्या रांगेत १००० मतदार उभे होते.प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी किमान १ मिनीट लागतो असे गृहीत धरले तर १ हजार मतदारांना मतदान करण्यासाठी १ हजार मिनीटे लागतील याचा अर्थ मतदान केंद्राबाहेरच्या सर्व १ हजार मतदारांना मतदान करण्यासाठी १६.५ तास मतदानासाठी लागतील पण प्रत्यक्षात ५ नंतर पुढच्या साडेसहा तासांत म्हणजेच ११.३० वाजता मतदान प्रक्रिया संपल्याचे आयोगाने जाहीर केले त्यामुळे या काळात सर्व १ हजार मतदारांनी मतदान करणे शक्यच नाही.मग हा ७६ लाखांचा आकडा कसा वाढला ?” असा प्रश्न करण थापर यांनी केल्यानंतर त्यावर परकला प्रभाकर यांनी आणखी दोन मुद्दे मांडले.

“मग दिवसभर मतदानच झाले नाही का ?”

आणखी दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत.भारतात प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी १००० ते १२०० मतदार असतात.जर मतदान संपल्यानंतर १००० मतदारांनी मतदान केले  असेल तर मग दिवसभर त्या मतदान केंद्रांवर काहीच मतदान झाले नाही का ? पण निवडणूक आयोगाच्याच आकडेवारीनुसार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५८.२२ टक्के मतदान झाले होते असा मुद्दा परकला प्रभाकर यांनी मांडला.त्याशिवाय दुसरी बाब म्हणजे निवडणूक आयोगाची नियमावलीत म्हटले आहे की जर मुदत संपेपर्यंत काही मतदारांना मतदान करता आले नाही तर मुदत संपताक्षणी मतदान केंद्राचे दरवाजे बंद करण्यात यावेत व रांगेत उभ्या असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीला १ क्रमांक देऊन सगळ्यात पहिल्या जागी उभ्या व्यक्तीला शेवटचा क्रमांक दिला जावा.जेणेकरून त्यात नव्याने कुठली भर पडणार नाही.या सगळ्या प्रक्रियेचे चित्रीकरण केले जावे पण आपण आयोगाकडे चित्रीकरणाची मागणी केली तर आयोग त्यावर काहीच बोलत नाही असा आरोप परकला प्रभाकर यांनी केला आहे.

 

0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

“मुख्यमंत्रिपद नशिबात असावे लागते” !! शिंदे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्रिपदावरून अजित पवारांना डिवचले !!

Next Post

‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान कसे वाढले ?’ !! मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले खरे कारण !!

You might also like More from author
राजकीय घडामोडी विशेष

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत देताच भाजपा नेत्याच्या घरावर भ्रष्टाचार प्रतिबंधक…

निवडणूक घडामोडी विशेष

यावल नगरपालिकेच्या भाजपा नगरसेवक गटनेता निवडीचा चेंडू आमदार अमोल जावळे यांच्या…

निवडणूक घडामोडी विशेष

मुंबईत भाजपा १२८ जागा लढवणार तर शिवसेनेला ७९ जागा मात्र २० जागांचा पेच अद्याप कायम !!

निवडणूक घडामोडी विशेष

२० जिल्हा परिषदा वगळता अन्यत्र निवडणुका तर १२ जिल्हा परिषद तसेच १२५ पंचायत समिती…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • तीनहत्ती चौकात वाहतुकीचा बोजवारा !! राँग साईड व रस्त्यावर उभी वाहने आणि ट्रॅफिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण !!
  • बारामतीतील सराईत गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी !! एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध !!
  • बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा संपन्न !!
  • यावल विभाग जळगाव उपवनसंरक्षक जमीर शेख यांची बदली तर नवीन उपवनसंरक्षक म्हणुन सौरीष सहाय यांनी पदभार स्वीकारला !!
  • एचव्हीपी लसीकरणाबाबत जनजागृती करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (अप) ची मागणी !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2026 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.