“जोपर्यंत कर्नाटक सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत कर्नाटकला बस सेवा जाणार नाही” !! महाराष्ट्रातील एसटीवर कर्नाटकात हल्ला झाल्यानंतर परिवहन मंत्र्यांचे आदेश !!
दरम्यान एका मुलीला मराठीत उत्तर न दिल्याबद्दल कर्नाटकच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या कंडक्टरला बेळगावी मारहाण करण्यात आली.चित्रदुर्गात एमएसआरटीसी बसवरील हल्ला हा कंडक्टरवरील कथित हल्ल्याचा बदला होता की नाही हे स्पष्ट झालेले नाही.सरनाईक म्हणाले की,एमएसआरटीसी बस चित्रदुर्ग ओलांडत असतांनाच कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केला.बेळगावी येथे कंडक्टरवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली आणखी एका प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे असे पोलिसांनी सांगितले.कंडक्टरवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.शुक्रवारी ५१ वर्षीय कंडक्टर महादेवप्पा मल्लप्पा हुक्केरी यांनी डोळ्यात अश्रू आणत पत्रकारांना सांगितले की,सुलेभावी गावात एक मुलगी तिच्या मित्राबरोबर बसमध्ये चढली.ती मराठीत बोलत होती त्यामुळे मी तिला सांगितले की मला मराठी येत नाही,कन्नडमध्ये बोल.मी जेव्हा मराठी येत नाही असे सांगितले तेव्हा त्या मुलीने मला शिवीगाळ केली आणि म्हटले की मला मराठी शिकावे लागेल.अचानक मोठ्या संख्येने लोक जमले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर आणि संपूर्ण शरीरावर हल्ला केला असे कंडक्टर म्हणाला.