Just another WordPress site

“कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो”असे वक्तव्य करून संभाजी भिडेंचा महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.भिडे गुरूजी यांनी हे विधान एका महिला पत्रकारासंदर्भात केले आहे.भिडे गुरूजी यांनी महिला पत्रकाराचा जाहीर अपमान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.संभाजी भिडे हे आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले होते त्यावेळी साम या मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी भिडे यांंना गाठून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी भिडे गुरुजी यांनी प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांच्याकडे पाहिले या महिला पत्रकाराच्या कपाळावर कुंकू नसल्याचे भिडे गुरूजी यांना आवडले नाही या कारणामुळे या महिला पत्रकाराला भिडे गुरूजी यांनी मुलाखत देण्यास थेट नकार दिला.महिला पत्रकाराला मुलाखत देण्यास नकार देताना संभीजी भिडे म्हणाले,’आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे भारतमाता विधवा नाही आहे.कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो’इतके वक्तव्य करून संभाजी भिडे पुढे चालू लागले त्यानंतही या महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र भिंडे यांनी महिला पत्रकाराशी बोलण्यास अखेरपर्यंत नकारच दिला.
महिला पत्रकार बडवे यांनी केला निषेध
संभाजी भिंडे यांच्या या भूमिकेचे महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी ट्विट करत निषेध केला आहे.त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आज माझ्यासोबत घडलेला हा सगळा प्रकार..आपण एखाद्याचे वय बघून त्याला मान देतो मात्र समोरची व्यक्ती देखील त्या पात्रतेची असावी लागते.मी टिकली लावावी-लावू नये किंवा कधी लावावी हा माझा अधिकार आहे आपण लोकशाही असलेल्या देशात राहतोय.’

Leave A Reply

Your email address will not be published.